• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत आज सायंकाळी ‘या’ कारणासाठी होणार तुफान गर्दी, पाहायला मिळणार अनोखा थरार..!

मिरज हायस्कुलच्या क्रीडागणावर भव्य दहीहंडीचा थरार, पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते सुशांत खाडे यांच्यावतीने आयोजन.!

Admin by Admin
August 31, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेत आज सायंकाळी ‘या’ कारणासाठी होणार तुफान गर्दी, पाहायला मिळणार अनोखा थरार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | मिरज शहरातील मिरज हायस्कुल मिरज येथे आज तुफान गर्दी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या वतीने मिरजेत आज ३१ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर हा दहीहंडी उत्सव सुरू होणार आहे. मिरज विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांनी या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे करण्यात आले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रसिद्ध सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, भाजप नेते मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रदेश कार्यकारणी सदस्य दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराजबाबा देशमुख, शेखर इनामदार, संग्राम देशमुख, सत्यजित देशमुख, नीताताई केळकर, माजी नगरसेवक सुरेश आवटी, युवा नेते सुशांतदादा खाडे, सुमनताई खाडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. उषाताई दशवंत, गीतांजली ढोपे पाटील, विक्रांत पाटील, माजी नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, पांडुरंग कोरे, गणेश माळी, अस्मिता सलगर, गायत्री कुल्लोळी, आनंदा देवमाने, सरिता कोरबू, प्राजक्ता कोरे, सुमन भंडारे, किरण बंडगर, त्रिशला खवाटे, दिलीप पाटील, मनोज मुंडगनूर, गीतांजली कणसे, शालन भोई, जनाबाई पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टीव्ही मालिकेतील बाळूमामा व घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेते सुमित पुसावळे, घरोघरी मातीच्या चुली व रंग माझा वेगळा फेम रेश्मा शिंदे, डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा जुन्नरकर, निवेदिका दीप्ती हलवाई आदी कलाकार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यावेळी ऑलिंपिक नेत्रदीपक आतिषबाजी व लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई डान्स ग्रुप यांचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. अशा विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचेही या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

मिरजेतील राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडेंची ‘ही’ मागणी..! म्हणाले, ‘यांच्या’वर कारवाई करा.

Next Post

कुपवाडमध्ये आज दहीहंडीचा थरार : सनीभाऊंची १,११,१११ रुपयांची भव्य दहीहंडी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये आज दहीहंडीचा थरार : सनीभाऊंची १,११,१११ रुपयांची भव्य दहीहंडी..!

कुपवाडमध्ये आज दहीहंडीचा थरार : सनीभाऊंची १,११,१११ रुपयांची भव्य दहीहंडी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group