• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | साताऱ्यात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल..

Admin by Admin
August 25, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
ब्रेकिंग | साताऱ्यात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवडाभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची 8 ते 10 प्रकरणे समोर आली आहेत.

यामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. ह्या घटना ताज्या असतानाच आता साताऱ्यातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे. मात्र, आज साताऱ्यातील पोवई नाक्यावर मुलीच्या नातेवाईकासह काही लोक एकत्र आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यामध्ये झटापट देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन सर्व बाजू समजावून घेतली.

काही दिवसापासून संशयित आरोपी हा मुलीला वारंवार त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाचा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आले होती. मात्र, काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातल्या लोकांना धमकी दिल्याने या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | दत्तवाड-एकसंबा बंधारा चालू वर्षात तिसऱ्यांदा पाण्याखाली

Next Post

भाजपचे माजी जिल्ह्याध्यक्ष व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

भाजपचे माजी जिल्ह्याध्यक्ष व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group