मिरज: गोपनीय खबऱ्या; प्रतिनिधी
मिरजेत हजारोंच्या संख्येत ठिकठिकाणी अगदी जल्लोषात आज पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होत आहे.यामध्ये मिरजकरांसाठी प्रमुख आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ अशी थाटात, दिमाखात उभी असलेली मूर्ती पाहण्यासाठी शिवभक्तांनी आणि मिरज व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अश्वारूढ शिवाजी महाराजांची मूर्ती मिरजकरांसाठी आकर्षण ठरत आहे, शिवभक्त विकास सूर्यवंशी यांनी शिवजयंतीच्या भव्य मिरवणूकीचे आयोजन केले आहे.

यामध्ये लाईट्स, लेजर, आणि साऊंडची जय्यत तयारी केली आहे. सर्व शिवप्रेमींनी अगदी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी व्हावे, शिवजयंती सर्वानीच साजरी केली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, निसर्गाच्या बिघाडामुळे कदाचित मेघराजाची हजेरी लागलीच तर पाऊसात शिवरायांसाठी एक तास आपण चिंब होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करायला काहीच हरकत नाही, असे आवाहन आम्ही शिवभक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास सूर्यवंशी यांनी केले आहे.

नदिवेस मधून लक्ष्मी मार्केट मार्गे शिवतीर्थपर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
यावेळेस आयोजक म्हणून शिवभक्त रवींद्र नाईक, गजानन मोरे, संदीप खटावकर, रोहित चौगुले, संदीप दिंडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

