• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देणाऱ्या इम्तियाज जलील यांना मनसेची ऑफर; म्हणे, “त्यांनी आधी”…!

Admin by Admin
May 1, 2022
in राजकीय, विशेष
1 min read
0
राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देणाऱ्या इम्तियाज जलील यांना मनसेची ऑफर; म्हणे, “त्यांनी आधी”…!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. १ मे रोजी होणाऱ्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार? याविषयी उत्सुकता वाढली असताना आधी शिवसेना-राष्ट्रवादीसोबत वाकयुद्ध सुरू असणाऱ्या मनसेचा एमआयएमसोबत देखील कलगीतुरा रंगू लागला आहे.

आज सकाळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं. यावर मनसेकडून खोचक टोला लगावतानाच जलील यांना ‘काउंटर ऑफर’ देण्यात आली आहे!

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी, “राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल”, असं जलील म्हणाले.

 

Aurangabad, Maharashtra | MNS chief Raj Thackeray is coming here for a rally on May 1. I invite him for Iftar. We'll sit together, it will spread a good message in the country. 99% of people are peace-loving, only 1% of people create disturbance: MP Imtiaz Jaleel (29.04) pic.twitter.com/mRa6db8P81

— ANI (@ANI) April 30, 2022

“..तर जलील यांना श्रीखंड-पुरीचं जेवण!”

दरम्यान, जलील यांच्या या निमंत्रणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना नवीन ऑफर दिली आहे. “आमची त्यांना काऊंटर ऑफर आहे. मशिदींवरील सर्व भोंगे उतरवा. सर्व मनसे कार्यकर्ते त्यांचा सत्कार करतील आणि त्यांना आवडत असेल तर श्रीखंड-पुरीचं जेवण देखील देतील”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी संदीप देशपांडे यांनी चंद्रकांत खैरेंना देखील टोला लगावला आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं खैरे म्हणाले होते. त्यावर बोलताना, “चंद्रकांत खैरेंना एवढंच सांगेन की ते संभाजीनगरचं आऊटडेटेड नेतृत्व आहे. जुना नोकिया फोन आपण वापरत नाही तसा हा प्रकार आहे. असं बोलून ते अपग्रेड होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तसं होणार नाही”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

Previous Post

“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय..”

Next Post

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अश्वारूढ शिवाजी महाराजांची मूर्ती ठरतेय मिरजकरांसाठी आकर्षण, शिवभक्त विकास सूर्यवंशी यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अश्वारूढ शिवाजी महाराजांची मूर्ती ठरतेय मिरजकरांसाठी आकर्षण, शिवभक्त विकास सूर्यवंशी यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक….

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अश्वारूढ शिवाजी महाराजांची मूर्ती ठरतेय मिरजकरांसाठी आकर्षण, शिवभक्त विकास सूर्यवंशी यांनी आयोजित केली भव्य मिरवणूक....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group