सांगली – खबऱ्या प्रतिनिधी | सांगली शहरात रविवारी लोणारी समाजाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यामध्ये लोणारी समाज सेवा संघ या संघटनेच्या सांगली जिल्ह्याकरिता पदाधिकारी निवडी व संचालक मंडळ यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यामध्ये सांगली जिल्हाध्यक्षपदी विजय परमेश्वर नरळे यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नवनाथ खिलारे यांची निवड करण्यात आली. यासह सचिवपदी संदीप धंगेकर व नामदेव हिप्परकर, खजिनदारपदी बाबासो मुंजे, संघटकपदी संजय खोत, सहसंघटकपदी भूषण होळकर व सहसचिवपदी प्रकाश करांडे यांची निवड करण्यात आली आहे.
सां.मि.कु. महानगरपालिका व परिसरातील गावांमध्ये लोणारी समाजाची लोकसंख्या चाळीस हजारांवर तर संपूर्ण जिल्ह्यात लाखात आहे. यामुळे समाजाची एकजूट होऊन प्रगती व्हावी या हेतूने सदरील निवडी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
निवडीवेळी प्रल्हाद (तात्या) नरळे, विशाल हिप्परकर, दामाजी करांडे, आप्पासो करांडे, रघुनाथ नवत्रे, राम खिलारे, मेजर गोपाल चवरे, हनुमंत कुटे, दादासो सांगोलकर, दत्तात्रय हिप्परकर , बाबासो गोडसे, अनिल बाड, शिवाजी क्षीरसागर, संतोष हारगे, महादेव खिलारे, दत्तात्रय हिप्परकर बुधगाव, महेश खिलारे, रमाकांत आटपाडकर, मेजर हणमंत बजबळे, रवी सांगोलकर, कुमार गळवे, अण्णाप्पा बजबळकर, गजानन गळवे, किशोर कुटे, युवराज करांडे, अमोल क्षीरसागर, शरद हेटकळे, विठ्ठल नरळे यांच्यासह लोणारी समाजातील बांधव उपस्थित होते.

