सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ;
राज्य पोलिस दलात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण सेवांसाठी पोलिस महासंचालक सन्मान जाहीर करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. पोलिस महासंचालकांकडून दरवर्षी राज्य पोलिस दलात उत्तम सेवेसाठी कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
यातच सांगली जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. मिरजेचे डीवायएसपी अशोक वीरकर , जतचे डीवायएसपी रत्नाकर नवले यांच्यासह सांगली जिल्ह्यातील १० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

सांगली पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेचे पी आय राजेश रामाघरे , एलसीबीचे एएसआय सिद्धाप्पा रुपनर, मोटार परिवहन विभागाचे एएसआय रावसाहेब पाटील, मोटार परिवहन विभागाचे पोलीस हवालदार अनिल लांडगे,एलसीबीचे संदीप गुरव, मिरज वाहतूक शाखेचे फारूक नालबंद, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे विकास पाटणकर , व पोलीस मुख्यालयातील महिला हवालदार स्नेहल सुतार यांना देखील पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले.
स्वतःचा जीव धोक्यात घालून नैसर्गिक आपत्ती च्या काळात सेवा बजावल्याचे कौतुक म्हणून डीवायएसपी अशोक वीरकर यांना हे सन्मानचिन्ह देण्यात येत आहे. त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठेने, निर्भीडपणे आणि शौर्याने महाराष्ट्र पोलीस दलाची गौरवशाली परंपरा कायम राखली. यांच्यासहित जिल्हा पोलीस दलातील १० जणांच्या या कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

