भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच यापुर्वी त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. त्यामुळेच त्यांना हि सुरक्षा झाली आहे.
गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीकडून हल्ले झाले आहे,त्यामुळे त्यांना हि सुरक्षा देण्यात आली. किरीट सोमय्या यांनाही याच दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
यावर काँग्रेसचे अतूल लोंढे यांनी टीका केली की,आधी हेच लोक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात त्यानंतर त्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते.
कंगना ते गोपीचंद पडळकर..
अभिनेत्री कंगना राणावत, किरीट सोमय्या, आमदार नवनीत राणा आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनाही केंद्रातर्फे सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

