
मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी वाघमोडे यांच्या घरावरून विजेची तार टाकून कनेक्शन घेणाऱ्या माजी सैनिक यमगर यांना ‘पावसाळ्याचे दिवस आहेत, शॉर्ट सर्किट होऊन करंट येईल, तुम्ही तार काढून घ्या’ असे म्हणत जाब विचारणाऱ्यास गेलेल्या तक्रारदार महिला व मुलास काठीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात वारंवार शेजाऱ्यांशी वाद घालणाऱ्या व लाकडी बांबूने डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांत तानाजी शिवाजी यमगर, संगीता तानाजी यमगर, शारदा शंकर सोलनकर व भिमराव विठ्ठल हाक्के यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

