• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, विशालगडावरील इस्लामिक अतिक्रमण, दर्गासुद्धा उध्वस्त करायला लावणार..!

Admin by Admin
August 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, विशालगडावरील इस्लामिक अतिक्रमण, दर्गासुद्धा उध्वस्त करायला लावणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • ”गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरविरोधी कायदा याबाबत आवाज उठवण्यासाठी मी पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी.”

सांगली- खबऱ्या प्रतिनिधी | ”राज्यातील गड-किल्ले अतिक्रमणमुक्त करायचे असतील तर हिंदुत्ववादी सरकारच आले पाहिजे. लोकसभेला हिरवा गुलाल उधळला गेला. मात्र आता विधानसभेला भगवा गुलालच उधळणार, असा निर्धार करा,” असे प्रतिपादन हिंदू एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.

प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार नितीन शिंदे यांचा हिंदुत्ववादी संघटना व हिंदू एकता आंदोलन, सांगली जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कच्छी भवन येथे आयोजित या सोहळ्यात गायत्री परिवाराचे प्रमुख नरेंद्र जानी, भाजपचे नेते दीपक शिंदे, उद्योजक मनोहर सारडा, व्यापारी संघटनेचे प्रदीप बोथरा, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

नितीन शिंदे म्हणाले, ”प्रतापगडावरील अफजलखान दर्ग्याभोवतीचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यास सरकारला भाग पाडले. त्याच पद्धतीने विशाळगडावरील इस्लामिक अतिक्रमण व बेकायदेशीर दर्गासुद्धा उद्ध्वस्त करायला लावणार आहे.”

यावेळी दीपक शिंदे म्हणाले, ”नितीन शिंदे समर्पित भावनेने काम करतात, हे प्रतापगडावरील, विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी आंदोलनात पाहिले आहे.” ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या, ”राज्यातील सध्याचे वातावरण पाहता विधानसभेमध्ये हिंदूंचे प्रश्न मांडण्यासाठी हिंदुत्ववादी आमदाराची गरज आहे.”

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नरेंद्र जानी, मनोहर सारडा, मनोज साळुंखे, शिवाजी पाटील, अरुण वाघमोडे, शैलेश पवार, अविनाश मोहिते, श्रीकांत शिंदे, महेंद्र चंडाळे, राजू रसाळ, विष्णुपंत पाटील, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

‘हिंदुत्वाचे प्रश्‍न मांडायला संधी हवी’

कार्यक्रमात वक्त्यांनी विधिमंडळात हिंदुत्वाचे प्रश्‍न मांडणारा उमेदवार हवा, असे मत मांडले. यावर नितीन शिंदे म्हणाले, ”गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणाविरोधात, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरविरोधी कायदा याबाबत आवाज उठवण्यासाठी मी पक्षाकडे हिंदुत्ववादी उमेदवार म्हणून मला संधी द्यावी, अशी मागणी करतो.”

Previous Post

समतानगरमध्ये विजेची तार काढण्याच्या कारणावरून हाणामारी, गुन्हा दाखल..!

Next Post

मिरजेत खाडे स्कूलचे संचालक स्व.दत्ता (अण्णा) खाडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत खाडे स्कूलचे संचालक स्व.दत्ता (अण्णा) खाडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

मिरजेत खाडे स्कूलचे संचालक स्व.दत्ता (अण्णा) खाडे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group