मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | मिरज बसस्थानकाच्या आवारात एका वृद्धाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. नारायण लक्ष्मण बडोदे (वय ६०) रा. रायबाग असे त्याचे नाव आहे. परंतु त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. नारायण बडोदे हे मिरजेत आले होते. ते बसस्थानक आवारातील पार्सल कार्यालयाजवळ मृता अवस्थेत आढळून आले. मिरज शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. यावेळी पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला आहे. बस स्थानक परिसरात नशेखोर तरुणांचा वाढता वावर पाहता, वृद्धाकडील पैसे काढून घेण्यासाठी त्यांना कोणी मारहाण केली का.? या वृद्धाचा काही घातपात झाला का.? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच वृद्धाचा ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा देखील पोलिसांनी तपासला आहे. त्यावेळी संबंधित वृद्ध व्यक्ती चालत असताना रस्त्यावर वरून पडून मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात ‘गोपनीय खबऱ्या‘ने अधिक चौकशी केल्यानंतर सदरील वृद्धाकडे काही रक्कम असल्याने त्यांचा पाठलाग करून अंधारात हा प्रकार घडल्याचे परिसरातील प्रत्यक्षदर्शी यांनी नाव न घेण्याच्या अटींवर गोपनीय माहिती दिली. याबाबत महात्मा गांधी पोलीस चौकीचे अधिकारी कर्मचारी अधिक तपास करीत असून लवकरच याची स्पष्टता होईल, अशी पोलिसांनी माहिती दिली.

