• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत दुचाकी वाहनात सापडली विनापरवाना बंदूक, दोन जिवंत काडतूसेही जप्त : गुन्हा दाखल.

Admin by Admin
July 25, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत दुचाकी वाहनात सापडली विनापरवाना बंदूक, दोन जिवंत काडतूसेही जप्त : गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज- खबऱ्या प्रतिनिधी | मिरजेतील एका मोठया सराफाच्या दुचाकी ऍक्टिव्हा वाहनातून विनपरवाना बंदूक व दोन जिवंत काडतूसे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याने मिरज शहरात खळबळ उडाली आहे .याप्रकरणी मिरज शहर पोलिसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरजेतील शनिवार पेठेतील काचेच्या गणपती मंदिरालगत असणाऱ्या रुंगठा उद्यानासमोर एका सराफाच्या घराजवळ लावलेल्या गाडीत विनापरवाना बंदूक असल्याची माहिती बुधवारी सकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने तेथे जाऊन दुचाकी ऍक्टिव्हा वाहन, बंदूक व दोन जिवंत काडतूसे ताब्यात घेतली आहेत. संबंधित सराफाची दिवसभर चौकशी करण्यात आली. प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थ्यांचे प्रयत्न सुरू होते. संबंधित सराफावर महिन्यापूर्वी विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला होता. जमिनीच्या वादातून विरोधी गट खोडसाळपणे असे प्रकार करीत असल्याचे संबंधित सराफाचे म्हणणे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन भीमराव खैरमोडे (वय ४३ वर्षे ) रा. दत्त चौक ब्राम्हणपुरी मिरज या संशयिताविरोधात मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदणी क्रमांक २३६/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या बंदी आदेशाप्रमाणे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.

Previous Post

‘त्या’ ग्रामसेवकाला ‘बीडीओं’चा आदेश अन पळापळ करीत बहाद्दराने ‘गायब’ केलेला ‘प्रिंटर’ केला पोहोच..!

Next Post

खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा

खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानला 'ब' वर्ग दर्जा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group