• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा

Admin by Admin
July 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून देवस्थान समितीला २० वर्षांनी मिळाले यश

मिरज खबऱ्या प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ‘ब’ वर्ग अंतर्गत ग्रामीण तीर्थस्थळांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्यासंदर्भात २९ डिसेंबर २०२३ रोजीच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार आटपाडीतील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे.

जिल्ह्यातील खरसुंडी येथील तीर्थक्षेत्र श्री सिद्धनाथ देवस्थानला ५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. गेली २० वर्षांपासून प्रतीक्षा करीत असलेल्या श्री सिद्धनाथ देवस्थान समितीला अखेर यश मिळाले. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याने खरसुंडी येथील नागरिक व श्री सिद्धनाथाचे भाविक वर्ग यांनी समाधान व्यक्त केले आहे.

श्री सिद्धनाथ देवस्थान मंदिराचा परिसर सुशोभीत करणे, भक्त निवास बांधणे, सभा मंडप, मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करणे, मल्टीपर्पज हॉल बांधणे व शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणे आदी सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा फंड मंजूर झाल्यानंतर विकास कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

Previous Post

मिरजेत दुचाकी वाहनात सापडली विनापरवाना बंदूक, दोन जिवंत काडतूसेही जप्त : गुन्हा दाखल.

Next Post

कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

कामगारांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group