• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ट्रक विकून केला चोरीचा बनाव, तपासात समोर आले ‘घरातील’ चोरट्याचे नाव..!

Admin by Admin
July 23, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ट्रक विकून केला चोरीचा बनाव, तपासात समोर आले ‘घरातील’ चोरट्याचे नाव..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने ट्रकची विक्री करून मित्राचा ट्रक नकली नंबरप्लेट लावून चोरीचा बनाव करण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेने सोमवारी उघडकीस आला.

यशवंत गडदे (रा.गोंडवाडी, ता. सांगोला) यांचा ट्रक मिरज-पंढरपूर रस्त्यावरील शेतकरी ढाबा येथून दि.११ जुलै रोजी चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी संकेत मगदूम, अमोल ऐदळे, सोमनाथ गुंडे हे करत असताना विश्रामबाग येथे संशयास्पद ट्रक लावण्यात आला असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन पाहिले असता ट्रकच्या नंबरप्लेटवर काळा रंग लावण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद वावरत असताना बिरदेव गडदे व गणेश भोसले यांना ताब्यात घेण्यात आले.

यातील गडदे याने चुलता यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून मालट्रक (एमएच ५०-४८७५) खरेदी केला होता. कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांने हा ट्रक मोहन शेंबडे यांना विकला. यानंतर मित्र भोसले याच्या मालकीचा ट्रक (एमएच १० झेड ४५८४) हा मिरज पंढरपूर रोडवर विकलेल्या ट्रकचा नंबर लावून तो चोरीस गेल्याची खोटी फिर्याद चुलत्याला देण्यास सांगितले होते. मात्र, मूळ ट्रकची विक्री करून तो चोरीस गेल्याची खोटी फिर्याद देऊन फायनान्स कंपनीचा चुलत्यामागे लागलेला तगादा चुकविण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली आहे.

Previous Post

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार

Next Post

ब्रेकिंग | मिरज – कोल्हापूर रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता, पंचांगंगा नदीचे पाणी वाढले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | मिरज - कोल्हापूर रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता, पंचांगंगा नदीचे पाणी वाढले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group