• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सुट्टीवर आला होता ‘जवान’, पत्नीने हात पाय आणि डोळे बांधून पाजले विष : कोल्हापुरात खळबळ..!

Admin by Admin
July 19, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजण्याची घटना घडली आहे.

या जवानाला ठार मारण्याच्या प्रयत्नाबद्दल पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमर भिमगोंडा देसाई, असे या ३९ वर्षीय जवानाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे नूल (ता. गडहिंग्लज) गावचे असलेले अमर हे पत्नीसह गडहिंग्लजला संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्याजवळ भाडोत्री घरात राहतात. अमर ड्युटीवर गेल्यानंतर पत्नी एकटीच घरी असते. दरम्यान, काही दिवसापूर्वीच अमर सुट्टीवर आले आहेत. गुरूवारी (ता. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातच पत्नी व तिच्या अज्ञात साथीदाराने अमरचे हात-पाय, डोळे बांधून त्याला नाकावाटे व तोंडावाटे कोणते तरी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यावेळी अमर याने जोरात ओरडल्याने शेजारचे नागरिक त्यांच्या घरी आले. दरवाजा तोडून नागरिकांनी आत प्रवेश केला. त्यावेळी अज्ञात साथीदाराने खाडे नावच्या नागरिकाच्या डोक्यात कशाने तरी मारून तेथून पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी जखमी खाडे व अमर यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

येथे प्राथमिक उपचारानंतर अमर यांना कोल्हापुरच्या सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर याच्या फिर्यादीवरून पोलिसात पत्नी व अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Previous Post

आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

Next Post

विशाळगडावरचा बाबा कोण? दर्गा कोणाचा? प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी सांगितली खरी हकीगत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विशाळगडावरचा बाबा कोण? दर्गा कोणाचा? प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी सांगितली खरी हकीगत

विशाळगडावरचा बाबा कोण? दर्गा कोणाचा? प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी सांगितली खरी हकीगत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group