• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विशाळगडावरचा बाबा कोण? दर्गा कोणाचा? प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी सांगितली खरी हकीगत

Admin by Admin
July 19, 2024
in विशेष
1 min read
0
विशाळगडावरचा बाबा कोण? दर्गा कोणाचा? प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी सांगितली खरी हकीगत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावर हिंदुत्ववादी संघनांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हिंसाचारानंतर राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मराठी लेखक आणि माजी आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशाळगडावरचा बाबा कोण? तो दर्गा कोणाचा? रेहानचा की मलिक उतगुजारचा? खरी हकीगत काय आहे आणि ब्रिटिश कागदपत्रातले पुरावे काय म्हणतात, यावर विश्वास पाटील यांनी सविस्तर पोस्ट करत माहिती दिली आहे.

विश्वास पाटील लिहितात,’१८८६ साली ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये पान क्रमांक ३२२ वर प्रसिद्ध केल्याप्रमाणे तेव्हाच्या विशाळगडावर १७ फूट लांब, पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा दर्गा होता. त्याची देखरेख करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून नऊ पाउंड म्हणजेच त्यावेळीच्या दरानुसार ९० रुपयांचा खर्च केला जात असे. हा दर्गा हजरत मलिक रेहान पीर यांचा आहे. तिथे दरसाल उरूस भरतो. त्या उरसाला ३०० ते ४०० भाविक हजर असतात. या जागृत ठिकाणाला मुसलमान तसेच हिंदू भाविकही भेट देतात अशा स्पष्ट नोंदी आहेत.’

इथे पूर्वी पंतप्रतिनिधींचा वाडा होता. तसेच भोज राजाने ६४०० स्क्वेअर फुटांचा एक तलाव बांधला होता. शिवाय अर्धचंद्राच्या आकाराचा १७ बाय १५ बाय ८ फुटांचा आणखी एक तलाव आहे. हा दुसरा तलाव रामचंद्रपंत अमात्य यांनी बांधून घेतला होता, अशी माहिती विश्वास पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सुट्टीवर आला होता ‘जवान’, पत्नीने हात पाय आणि डोळे बांधून पाजले विष : कोल्हापुरात खळबळ..!

Next Post

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group