• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

Admin by Admin
July 19, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिनाविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, नेमिनाथनगर सांगली, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग.कांबळे यांनी मोटार वाहन कायद्याबद्दल माहिती देवून अपघातापासून स्वतःचे व कुटुंबांचे संरक्षण करावे असे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी वाहन परवाना काढला नाही त्यांनी तात्काळ आजच तो काढण्याची सुरूवात करावी. कायद्याची सुरवात ही स्वतः आपल्या घरातून केली पाहिजे. कायदा हा घरातूनच पहिल्यांदा अंमलात आणला पाहिजे, त्यामुळे आपली व समाजाची तसेच राष्ट्राची प्रगती होईल व राष्ट्र सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामाबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

अॅड. अमोल डोंबे यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय जागतिक न्याय दिनाविषयी मार्गदर्शन केले. कायदा हा सर्वत्र आहे, कायद्याची माहिती असणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगून 1 जुलै 2024 पासून नव्याने लागू झालेल्या कायद्याची माहिती दिली. प्रत्येकाने कायदा हा पाळलाच पाहिजे त्यामुळे आपली, समाजाची व राष्ट्राची प्रगती निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रियांका मजलेकर यांनी केले. आभार कोमल पवार यांनी मानले. या शिबिराचे नियोजन महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. एस.ए. तांबोळी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यांनी केले. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी बहुसंख्यने उपस्थित होते.

Previous Post

सांगलीच्या महसूल प्रशासनात खळबळ, अप्पर तहसीलदारास खुनाची धमकी..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | सुट्टीवर आला होता ‘जवान’, पत्नीने हात पाय आणि डोळे बांधून पाजले विष : कोल्हापुरात खळबळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | सुट्टीवर आला होता 'जवान', पत्नीने हात पाय आणि डोळे बांधून पाजले विष : कोल्हापुरात खळबळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group