• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | आयुक्त शुभम गुप्ता चर्चेत, व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे..! वाचा सविस्तर

Admin by Admin
June 16, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सांगली | आयुक्त शुभम गुप्ता चर्चेत, व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे..! वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या स्तरावर वारंवार पर्यावरण रक्षणाच्या चर्चा होत असतात. त्यासाठी वृक्षारोपणासह अनेक उपक्रमही राबविले जातात. मात्र, निमित्त असेल तरच पर्यावरणपूरक कार्यक्रम हाती घेतले जातात. मात्र, एखाद्या गोष्टीतून सतत पर्यावरण रक्षणाचा संदेश व कृती करण्याला प्रोत्साहन देता येऊ शकेल का, असा विचार महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी केला. त्यातून त्यांना व्हिजिटिंग कार्डची संकल्पना सुचली. त्यांनी लागलीच ती कृतीत उतरविली. त्याबाबतची एक पोस्ट त्यांनी केल्यानंतर सोशल मिडियावरुन ती व्हायरल होत लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अनोख्या उपक्रमातून ते चांगलेच चर्चेत येत आहेत. त्यांनी पर्यावरणपूरक कार्ड तयार करुन ते कार्यालयात येणाऱ्या सर्व लोकांकरीता उपलब्ध केले आहे. विशेष म्हणजे काम संपताच हे कार्ड पाण्यात भिजवून मातीत रोवले की त्यातून रोपटे उगवते.

शुभम गुप्ता यांचे हे व्हिजिटिंग कार्ड सीड (बीज) कार्ड आहे. हे व्हिजिटिंग कार्ड पर्यावरणपूरक असून काम झाल्यानंतर हे कार्ड फेकून देण्याऐवजी भिजवून कुंडीत किंवा मातीत रोवले तर त्याचे रोपटे तयार होते. झेंडूच्या बिया यामध्ये आहेत.

सीड पेपर हा टाकाऊ कागदापासून बनवलेला बायोडिग्रेडेबल इको-पेपर आहे. यामध्ये झाडांच्या बिया असतात आणि हा पेपर तयार करण्यासाठी कोणत्याही झाडाची कत्तल केली जात नाही. जेव्हा हा सीड पेपर मातीत टाकला जातो तेव्हा या बियांमधून रोप तयार होते.

आयुक्त गुप्ता यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या कार्यालयात येणाऱ्या सर्वांना आता हे कार्ड मिळणार आहे. हे व्हिजिटिंग कार्ड खास आहे.

शुभम गुप्ता यांचे याबाबतचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ११ हजारहून अनेक जणांनी हे ट्वीट लाईक केले असून जवळपास सहाशे जणांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Previous Post

सांगलीतील ‘ओन्ली आज्या’ टोळीतील सात जणांना मोक्का

Next Post

सांगली जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा कोणाची कोठे झाली बदली..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

सांगली जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा कोणाची कोठे झाली बदली..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group