• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील ‘ओन्ली आज्या’ टोळीतील सात जणांना मोक्का

Admin by Admin
June 14, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – वडर कॉलनीतील अश्विनकुमार मुळके याच्या खुनातील संशयित असलेल्या ‘ओन्ली आज्या’ टोळीतील सात जणांना विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ‘मोक्का’ लावण्यास मंजुरी दिली.

टोळीप्रमुख अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय २३, बाल हनुमान गल्ली), टोळी सदस्य विकी प्रशांत पवार (वय २३), कुणाल प्रशांत पवार (वय २२, वडर कॉलनी, उत्तर शिवाजीनगर), गणेश रामाप्पा ऐवळे (वय ३६, गोकुळनगर), सुजित दादासाहेब चंदनशिवे (वय २९, फायर स्टेशनसमोर, उत्तर शिवाजीनगर), अमोल गंगाप्पा कुंचीकोरवी (वय २८), अर्जुन हणमंत पवार (वय २२, रेल्वे स्टेशन रस्ता, वडर कॉलनी) या सात जणांच्या टोळीविरुद्ध खुनाबरोबर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे.

संशयित अजय ऊर्फ अजित खोत याने ‘ओन्ली आज्या’ नावाने टोळी बनवली होती. या टोळीने दि. १३ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरुद्वाराजवळ घरासमोर अश्विनकुमार मल्हारी मुळके (वय ३०, नवीन वसाहत, सांगली) याचा खून केला होता. त्या दिवशी संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता. विकी याला अश्विनकुमारने हा रस्ता वाहतुकीसाठी नसल्याने दुसऱ्या मार्गाने जावा असे सांगितले. याचा राग मनात धरून विकी तेथून गेला. त्यानंतर दोन तासांनी मध्यरात्री १ च्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या सात जणांनी अश्विनकुमारला घराबाहेर बोलावून चाकू आणि इतर हत्यारांनी भोसकून खून केला.

अश्विनकुमारचा आरडाओरडा ऐकून त्याचा मित्र गणेश महादेव हाताळे मदतीसाठी घटनास्थळी आला. तो देखील हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर संशयित हवेत हत्यारे नाचवत ‘नाद करायचा नाही’ असे म्हणत दहशत माजवत पसार झाले होते.

टोळीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सात जणांना अटक केली. टोळीविरुद्ध २०१४ पासून २०२४ पर्यंत गुन्हे दाखल आहेत. टोळीचे वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळीने दहशत निर्माण केली होती. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लावण्यासाठी विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी अधीक्षक संदीप घुगे यांना प्रस्ताव सादर केला.

अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांना पाठवला. त्यांनी अवलोकन करून टोळीविरुद्ध मोक्का कलम लावून तपास करण्यास मंजुरी दिली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव तपास करत आहेत.

गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक ओमासे, उपनिरीक्षक सिद्धार्थ रुपनर, कर्मचारी अमोल ऐवळे, दीपक गट्टे, बसवराज शिरगुप्पी, पूजा जगदाळे आदींनी सहभाग घेतला.

Previous Post

सांगली | शिवसेना शिंदे गट ‘ही’ विधानसभा लढवण्यासाठी आग्रही.!! पक्षप्रमुखांसह मित्रपक्षांकडेही करणार मागणी..!

Next Post

सांगली | आयुक्त शुभम गुप्ता चर्चेत, व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | आयुक्त शुभम गुप्ता चर्चेत, व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे..! वाचा सविस्तर

सांगली | आयुक्त शुभम गुप्ता चर्चेत, व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group