• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | शिवसेना शिंदे गट ‘ही’ विधानसभा लढवण्यासाठी आग्रही.!! पक्षप्रमुखांसह मित्रपक्षांकडेही करणार मागणी..!

Admin by Admin
June 14, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरज विधानसभा मतदारसंघ हा मुळ शिवसेनेचा आहे, त्यासाठी नेहमीच आम्ही मित्रपक्षांसहित वरिष्ठांसोबत समन्वय व संपर्क करीत आलो आहे. मिरज विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला देण्यात यावा, अशी मागणी येथील कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे शिवसेना युवा जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी सांगितले. मिरजेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही यासंदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सुनिता मोरे, रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, उमाकांत कार्वेकर, मतीन काजी, मल्लू पाटील, राणी कमलाकर, नानासाहेब शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत बोलताना सचिन कांबळे म्हणाले की, सन १९९५, १९९९ व २००४ या विधानसभा निवडणुका मिरज मतदार संघातून शिवसेनेच्या उमेदवाराने लढविल्या आहेत. यावेळी त्यांना लक्षणीय मते मिळाली आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मतदार मोठ्या संख्येने आहे.

सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेने मोठ्या मनाने मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपला दिला. आता भाजपने तो मतदार संघ शिवसेनेसाठी सोडावा. या ठिकाणी शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून याबाबत मागणी करणार आहे. निश्चितच हा मतदार संघ शिवसेना लढवेल, असा विश्वास सचिन कांबळे आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

दुःखद बातमी | रुद्र पशुपती मठाचे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे निधन

Next Post

सांगलीतील ‘ओन्ली आज्या’ टोळीतील सात जणांना मोक्का

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

सांगलीतील 'ओन्ली आज्या' टोळीतील सात जणांना मोक्का

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group