• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दुःखद बातमी | रुद्र पशुपती मठाचे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे निधन

Admin by Admin
June 14, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
0
दुःखद बातमी | रुद्र पशुपती मठाचे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोळे (ता. सांगोला) येथील रुद्र पशुपती मठाचे ३० वे मठाधिपती कोळेकर महाराज यांचे वयाचे ६१ व्या वर्षी अल्प आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भक्तामध्ये शोककळा पसरली आहे.

कोळेकर महाराज यांचे मूळ गाव निमसोड (जि. सातारा) येथे असून त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६२ ( वसंतपंचमी) या दिवशी माहुली येथे झाला. १९७३ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा निमसोड येथे पट्टाभिषेक करण्यात आला. काशी जगद्गुरु चंद्रशेखर महाराज यांचे मार्गदर्शनाखाली जंगमवाडी मठात धार्मिक व अध्यात्मिक शिक्षण पूर्ण केले. तदनंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोळेकर मठाचे माध्यमातून धर्म जागृतीचे कार्य अखंडपणे केले. त्यांचे गुरुतत्त्वाखाली तेरा ठिकाणी अग्नी होम, निमसोड येथे दोन वेळा कोटी बिल्वार्चन, मुंबई व अन्य ठिकाणी परम रहस्य पारायण शिवदिक्षाविधी तसेच कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी असे उपक्रम राबवून धर्मप्रसार केला.

प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ३० मे रोजी मिरज येथील सेवासदन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील डायमंड रुग्णालयात हालवण्यात आले होते. आज सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Previous Post

मोठी बातमी | मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाबाबत पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय..! वाचा सविस्तर

Next Post

सांगली | शिवसेना शिंदे गट ‘ही’ विधानसभा लढवण्यासाठी आग्रही.!! पक्षप्रमुखांसह मित्रपक्षांकडेही करणार मागणी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

सांगली | शिवसेना शिंदे गट 'ही' विधानसभा लढवण्यासाठी आग्रही.!! पक्षप्रमुखांसह मित्रपक्षांकडेही करणार मागणी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group