केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या मंदिरात पूजा केली. महायुतीचे ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलीक व ‘हातकणंगले’चे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार तसेच तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह काल रात्री उशिरा कोल्हापूर येथे दाखल झाले.
अमित शाह यांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. अंबाबाईचे दर्शन घेऊन, नेत्यांसोबत बैठक घेऊन शहा पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

