सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी विटा येथे घेण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलतांना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेऊ शकतील का? आहे का त्यांच्यात हिम्मत? नाही तर तुम्ही शिवसेनेचे नाही तर नकली सेनेचे अध्यक्ष आहात, असा टोला अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
विट्यातील सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी पक्ष फुटीवर भाजपवर हल्लाबोल केला होता. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाला नकली शिवसेना म्हटलं होतं. यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची तोफ डागली होती. ठाकरेंच्या त्या हल्लाबोलावर आज अमित शहा यांनी विट्यात उत्तर दिलंय.

