• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

BIG BREAKING | सांगलीत भाजपला धक्का ! माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षाला सोडचिठ्ठी; आता विशाल पाटील यांना पाठिंबा देणार..! म्हणाले, “मी…!”

Admin by Admin
April 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभा निवडणुकीची सध्या राज्यभर चर्चा आहे. एकीकडे महविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना भाजपमध्ये सगळं आलबेल नाही.

जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सोमवारी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, त्यांच्यासोबत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी संजयकाकांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता. तसेच खासदार संजय राऊत त्यांना महविकास आघाडीचे वास्तव सांगत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता.

भाजपमध्ये खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी मिळताच जत तालुक्यात त्यांच्या विरोधात कार्यकर्ते तयार असल्याचा आरोप करत विलासराव जगताप यांनी खासदार पाटील यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध केला होता. त्यावेळी संजयकाका गटाने त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, पक्षाने तशी कारवाई न करता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

आमदार विलासराव जगताप यांनी सोमवारी झालेल्या मेळाव्यात विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे.

यामध्ये म्हटलं की, “भारतीय जनता पार्टीमध्ये मी, आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले आहे. परंतु, पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आले. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो. तरी मी आपल्या भाजपचा राजीनामा देत आहे.”

Previous Post

सांगली ब्रेकिंग | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का, ‘या’ पदाधिकाऱ्याचा राजीनामा.. वाचा सविस्तर

Next Post

सांगली ब्रेकिंग |’…तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी’; चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग |'...तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी'; चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group