• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग |’…तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी’; चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले.. वाचा सविस्तर

Admin by Admin
April 15, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, यानंतर आता काँग्रेसच्याविशाल पाटील यांनीही या जागेवर दावा केला असून पाटील यांनी आज अपक्ष उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान, आज सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी, ‘काँग्रेसला शेतकऱ्यांचा लेक खासदार नकोय का, त्यांनी तसं सांगावं मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे’, असं मोठं विधान त्यांनी केलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

“काँग्रेस पक्षाने एवढंच जाहीर कराव की शेतकऱ्याचा पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही. भविष्यात शेतकरी कुटुंबातील मुलानं लोकसभा, विधावसभा लढवायची ही अपेक्षा तर करायची की नाही, असंही चंद्रहार पाटील म्हणाले.

” माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल, त्रास वाटत असेल तर मी आज सर्वांच्या पुढं सांगतो मी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे. फक्त आपल्या मित्र पक्षाने एवढच जाहीर करावं की, शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून चालणार नाही. तुझ्या मागे कुठला कारखाना नाही, तुझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता. म्हणून तुला आम्ही उमेदवारी देत नाही, असं त्यांनी जाहीर करावं माझी माघार घ्यायची तयारी आहे, असं मोठं विधान करत चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांना टोला लगावला आहे.

सांगली लोकसभेत काँग्रेस अजूनही प्रचारात उतरलेली नाही. दुसरीकडे, विशाल पाटील यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता चंद्रहार पाटलांसमोर विशाल पाटील यांचं मोठं आव्हान असणार आहे. यामुळे आज महाविकास आघाडीच्या मेळाव्यात चंद्रहार पाटील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Previous Post

BIG BREAKING | सांगलीत भाजपला धक्का ! माजी आमदार विलासराव जगताप यांची पक्षाला सोडचिठ्ठी; आता विशाल पाटील यांना पाठिंबा देणार..! म्हणाले, “मी…!”

Next Post

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटील थेट पायाच पडले, या नेत्याचा जयंतरावांना फोन.. म्हणाले,..! वाचा सविस्तर…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | जयंत पाटील थेट पायाच पडले, या नेत्याचा जयंतरावांना फोन.. म्हणाले,..! वाचा सविस्तर...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group