• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | विटा पोलिसांची कारवाई,६८ हजारांचा गुटखा पकडला..

Admin by Admin
April 8, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | विटा पोलिसांची कारवाई,६८ हजारांचा गुटखा पकडला..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हिवरे गावाजवळील अपघातग्रस्त चारचाकी गाडीत ६८ हजारांचा गुटखा सापडल्याची माहिती समोर आली आहे. विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी ही माहिती दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक मेमाणे म्हणाले, रविवारी (दि.८) सकाळी ११ च्या दरम्यान हिवरे गावच्या हद्दीत नागज ते भिवघाट रस्त्यावर एका चारचाकी गाडीचा (क्र. एम एच १२ एन एक्स ०४३६) अपघात झाला होता. याप्रकरणी भरधाव वेगात गाडी चालवून अपघात केल्याबाबत चालक महादेव प्रकाश पाटोळे, (वय ३८, रा. पेडगांव रोड वडूज, ता.खटाव, जि सातारा) याच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या गाडीत दोन बारदानची पोती आढळून असून त्यातील एका लहान पोत्यामध्ये विमल पान मसाल्याचे एकूण ५२ पाकीट, असे ८ पोत्यात ४१६ पाकीटे होती. तसेच तीन पांढऱ्या रंगाची नायलॉनच्या पोत्यात एकूण ६२४ तंबाखूची पाकीटे होती. या दोन्हींची किंमत ६८ हजार ६४० रुपये इतकी आहे. याबरोबरच चार लाख रुपये किमतीची संबंधित गाडी (क्र. एम एच १२ एन एक्स ०४३६) जप्त करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी महादेव विष्णू चव्हाण यांनी फिर्याद दिली.या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करीत आहेत.

Previous Post

काँग्रेस की ठाकरे गट.? सांगलीतील मतदार म्हणतात..कोण लढणार..!

Next Post

सांगली |मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली |मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन..

सांगली |मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group