• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

काँग्रेस की ठाकरे गट.? सांगलीतील मतदार म्हणतात..कोण लढणार..!

Admin by Admin
April 8, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
काँग्रेस की ठाकरे गट.? सांगलीतील मतदार म्हणतात..कोण लढणार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli Loksabha election : महाविकास आघाडीचा सांगलीत नेमका कोणाचा उमेदवार असेल हे, उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेसचा दावा कायम आहे.

त्यामुळं ठाकरेंचाच उमेदवार राहणार की काँग्रेसच्या विशाल पाटलांची लॉटरी लागणार ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरु असतानाच निर्णयाची गुढी उभारण्याचा इशारा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी दिलाय. मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. याच पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणेसह सांगली तसंच भिवंडीच्या जागेवरुनही घोषणा होईल.

कोणाला मिळणार उमेदवारी?

सांगलीत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिलीये. मात्र इथं काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसकडून सांगलीत विशाल पाटील इच्छुक उमेदवार आहे. जे सांगलीत झालं तसंच भिवंडीत शरद पवार गटासोबत काँग्रेसचा तिढा आहे. भिवंडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बाळ्या मामा म्हात्रेंना उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे इच्छुक आहेत.

काँग्रेसचा जागेवर दावा कायम

पहिल्या 2 टप्प्यासाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर, पहिल्यांदाच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होत आहेत. मात्र या पत्रकार परिषदेआधी, ठाकरे गटाकडून संजय राऊत सांगलीच्या जागेवरुन वाद मिटल्याचं सांगत आहेत. तर सांगलीच्या जागेची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार असल्याचं सांगून पुन्हा काँग्रेसकडेच जागा येईल असा विश्वास व्यक्त करत आहेत.

राऊतांचा काँग्रेसवर नेत्यांवर हल्लाबोल

सांगलीत संजय राऊतांनी नुकताच 2 दिवसांचा दौरा केलाय. या दौऱ्यातून राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांवर हल्लाबोल केला. नौटंकीही काढली आणि उमेदवार बदलणार नाही असंही ठणकावलं. पण काँग्रेसही माघार घेण्यास तयार नाही. विश्वजित कदमांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडचीही भेट घेतली आणि सकारात्मक निर्णयाचा विश्वासही व्यक्त केला. तर निर्णय होण्याआधीच सांगलीत संजय राऊत 2 दिवस का आले ? असा सवाल विशाल पाटील करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | प्रकाश आंबेडकर, महादेव जानकरांना मिळालं ‘हे’ नवं निवडणूक चिन्ह

Next Post

ब्रेकिंग | विटा पोलिसांची कारवाई,६८ हजारांचा गुटखा पकडला..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | विटा पोलिसांची कारवाई,६८ हजारांचा गुटखा पकडला..

ब्रेकिंग | विटा पोलिसांची कारवाई,६८ हजारांचा गुटखा पकडला..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group