• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली |मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन..

Admin by Admin
April 8, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली |मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सुरक्षेच्या कारणास्तव मोक्क्यातील चार कैद्यांना कळंबा कारागृहातून चंद्रपूर येथील कारागृहात पाठवताना विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (वय २३, रा. खंडेराजुरी, ता. मिरज, जि. सांगली) या कैद्याने चालत्या वाहनातून उडी टाकून पलायन केले.

नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ८) पहाटे घडलेल्या घटनेनंतर कोल्हापूर आणि नांदेड पोलिसांनी पळालेल्या कैद्याला मडकी कळंबर (जि. नांदेड) येथून चार तासात पुन्हा जेरबंद केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चार कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव चंद्रपूर येथील कारागृहात पाठवले जात होते. रविवारी सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात चार कैद्यांसह वाहन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. पहाटे तीनच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील सोनखेड हद्दीत वाहनाची गती कमी असल्याचे पाहून कैदी विशाल रुपनर याने वाहनाचे दार उघडून बाहेर उडी मारली. काही क्षणात तो रात्रीच्या अंधारात बाजूच्या शेतात गायब झाला.

पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती ११२ क्रमांकावरून नांदेड पोलिसांना दिली. काही वेळातच दाखल झालेले पोलिसांची पथके आणि श्वान पथकाद्वारे कैद्याचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिस, पोलिस पाटील आणि पोलिस मित्रांच्या मदतीने कैदी रुपनर याला मडकी कळंबर गावाच्या शेतातून ताब्यात घेतले. चार तासांच्या शोध मोहिमेनंतर कैदी सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपअधीक्षक सुनीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने आणि त्यांच्या पथकाने कैद्याचा शोध घेतला.

खराब रस्ता आणि काढलेली बेडी

सोनखेड येथे एकेरी आणि खराब रस्ता असल्याने वाहनांची गती कमी असते. कैदी रुपनर याच्या हातात बेडी नव्हती. याचाच फायदा उठवत त्याने पलायन केले. प्रवासादरम्यान कैद्यांना बेडी घालण्यात आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यात कसूर केल्याबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Previous Post

ब्रेकिंग | विटा पोलिसांची कारवाई,६८ हजारांचा गुटखा पकडला..

Next Post

“सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो”, गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो”, गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान

"सात वर्षांत एकही दंगल नाही, कारण आम्ही उलटे टांगतो", गडकरींच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथांचे विधान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group