• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | सांगलीचा उमेदवार परत घेतो, मातोश्रीचा काँग्रेसला १०० कोटींचा प्रस्ताव.? भाजपच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट..! वाचा सविस्तर

Admin by Admin
April 6, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो, पण आम्हाला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्रीवरून काँग्रेसला देण्यात आला आहे.

या प्रस्तावाच्या निमित्ताने दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकविण्यासाठी संजय राऊत यांचा सांगली दौरा असल्याचा गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सांगलीच्या दौर्‍यावर आहेत. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून आधीच धुसफूस सुरू आहे. शरद पवार गट व काँग्रेसची मते विचारात न घेता ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना सागंलीतून उमेदवारी दिली. त्यांच्याच प्रचारासाठी आणि गाठीभेटी घेण्यासाठी संजय राऊत सांगलीमध्ये गेले आहेत, असे चित्र ठाकरे गटाकडून भासविण्यात येत आहे.

सांगलीच्या उबाठा कार्यकर्त्यांना वाटत असेल की, संजय राऊत आमच्यासाठी आले आहेत. चंद्रहार पाटलांना वाटत असेल की, भांडुपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आला आहे, पण खरे तर, जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करताहेत्, त्यासाठी संजय राऊत दबाव टाकण्यासाठी गेले. ही माहिती खरी की खोटी, याची माहिती संजय राऊत किंवा त्याच्या मालकाने द्यावी. मला पुण्यातील एका काँग्रेस नेत्याचा सकाळी फोन आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटींमध्ये तडजोड करण्याचा प्रस्ताव मातोश्रीवरून आला आहे. पण, काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत अशा कोणत्याही मागणीला भीक घालणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

निवडणूक म्हणजे ठाकरे कंपनीसाठी धंदा

निवडणुकीचा संपूर्ण प्रवास पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धंदा राहिला आहे. विधानसभा, लोकसभेचे तिकीट विकायचे आणि स्वतःचे घर चालवायचे, हा उद्धव ठाकरेंचा जुना धंदा आहे आणि त्या धंद्याचाच भाग म्हणजे संजय राऊतचा आजचा सांगली दौरा, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.

Previous Post

ब्रेकिंग | राऊत सांगलीत असतानाच विशाल पाटील निवडणूक रिंगणात, लवकरच जाहीर होणार उमेदवारी..? वाचा सविस्तर

Next Post

ब्रेकिंग | सांगलीचा तिढा वाढला! “संजय राऊत मर्यादा पाळा”; नाना पटोलेंनी थेट खडसावलं

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | सांगलीचा तिढा वाढला! "संजय राऊत मर्यादा पाळा"; नाना पटोलेंनी थेट खडसावलं

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group