• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | राऊत सांगलीत असतानाच विशाल पाटील निवडणूक रिंगणात, लवकरच जाहीर होणार उमेदवारी..? वाचा सविस्तर

Admin by Admin
April 6, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | राऊत सांगलीत असतानाच विशाल पाटील निवडणूक रिंगणात, लवकरच जाहीर होणार उमेदवारी..? वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सांगलीच्या जागेबाबत कॉंग्रेस नेत्यांची समजूत काढण्यासाठी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगलीत असताना विशाल पाटील यांनी सांगलीकराना खुले पत्र लिहून सांगलीचा गड केवळ लढवायचा नव्हे तर जिंकायचा आहे असा संदेश देत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत शनिवारी दिले.
यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पत्रात पाटील म्हणतात, मागच्या काही वर्षांत सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झाले आहे.

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची अडचण : संजय राऊतांनी घेतली ‘यांची’ भेट..! वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी | सांगलीचा उमेदवार परत घेतो, मातोश्रीचा काँग्रेसला १०० कोटींचा प्रस्ताव.? भाजपच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मोठी बातमी | सांगलीचा उमेदवार परत घेतो, मातोश्रीचा काँग्रेसला १०० कोटींचा प्रस्ताव.? भाजपच्या 'या' आमदाराचा गौप्यस्फोट..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group