• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीचा तिढा वाढला! “संजय राऊत मर्यादा पाळा”; नाना पटोलेंनी थेट खडसावलं

Admin by Admin
April 7, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Nana Patole replies Sanjay Raut : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय.

इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय राऊतांना घातलाय. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असे अगदी पद्धतशीरपणे सांगून टाकले.

यानंतर सांगलीतील सभेत काँग्रेस नेत्यांनी आता नौटंकी बंद करावी असे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी नौटंकी बंद करावी. लहान कार्यकर्त्यासारखं वागू नये, अशा शब्दांत त्यांना समज दिली.

#नाना पटोले यांनी (Nana Patole) आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटातील नेत्यांनाही फटकारले. पटोले म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा सामोपचाराने लवकरच सोडविण्यात येईल. संजय राऊत यांनीही आता मर्यादा पाळावी. यानंतर त्यांना एकनाथ खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर पटोले म्हणाले, एकनाथ खडसे भाजपात (Eknath Khadse) जातील असं वाटत नाही. ते स्वाभिमानी नेते आहेत. त्यांचा भाजपमध्ये छळ झाला. हे त्यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं होतं. त्यांना भाजपने वाईट वागणूक दिली. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जातील असं वाटत नाही. असे नाना पटोले यांनी सांगितले. यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी आपल्या पक्षात सगळेच भ्रष्टाचारी घेतले आहे. या भ्रष्टाचारी लोकांकडून आता देशाची संपत्ती लुटण्याचे काम केले जात आहे.

Previous Post

मोठी बातमी | सांगलीचा उमेदवार परत घेतो, मातोश्रीचा काँग्रेसला १०० कोटींचा प्रस्ताव.? भाजपच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट..! वाचा सविस्तर

Next Post

मोठी ब्रेकिंग | भिवंडी, सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार?; महाविकास आघाडीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मोठी ब्रेकिंग | भिवंडी, सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार?; महाविकास आघाडीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group