• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक; शिरोळ तालुक्यातील तिघांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Admin by Admin
April 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : फर्ममध्ये पैसे गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून नऊ गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाख ८३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इन्फिनिटी एसयू व्हेंचर एलएलपी फर्मचे उदयकुमार चौगुले (रा.उमळवाड, ता. शिरोळ), सुहास पाटील (रा. टाकवडे, ता. शिरोळ), श्रीकृष्ण कबाडे (रा. बुबनाळ, ता. शिरोळ), शंकर कोरे, अक्षय गौराजे (पूर्ण पत्ता नाही) या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रशांत महेश मोहनानी (वय ३८, रा. पत्रकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पाच जणांची इन्फिनिटी एसयू व्हेंचर एलएलपी या नावाची फर्म आहे. या पाच जणांनी फिर्यादी मोहनानी व इतर आठ जणांना फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवले. त्यावर नऊ जणांचा विश्वास बसला.मोहनानी यांच्याकडून एक कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये फर्ममध्ये गुंतवणूक करून घेतले. मोहनानी यांच्या गुंतवणूक रकमेवरील मुद्दल व परतावा मिळून ५० लाख रुपये, १३ लाख २६ हजार रुपये व्याज तसेच आयकर स्वरूपात दिलेला एक लाख ३२ हजार ६०० रुपये टीडीएस, अशी ५१ लाख ३६ हजार ४०० रूपये रक्कम ऑनलाइन घेतली होती.

तसेच मोहनानी याची शिल्लक मूळ मुद्दल रक्कम १ कोटी १३ लाख ३८ हजार ६०० रुपये होती. मोहनानी यांची एकूण १ कोटी १३ लाख ३८ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. तसेच पद्मिनी मोहनानी यांची ३० लाख ८० हजार रुपयांची, मच्छिंद्र मारुती खोत (रा. सिद्धेवाडी) यांची ९ लाख ६० हजार दोनशे रुपयांची, प्रकाश सूर्यकांत तवटे (रा. एरंडोली) यांची ७ लाख ६० हजार रुपयांची, बाजीराव अण्णाप्पा शेलार (रा. सोनी) यांची ११ लाख ८९ हजार ५०० रुपयांची, सिद्धू शिवाजी मलमे (रा. सुभाषनगर) यांची ३ लाख ८७ हजार ५०० रुपयांची, सुहास बबनराव मोहिते (रा. मांजर्डे) यांची ९ लाख ३ हजार रुपयांची, सुधीर संभाजी जाधव (रा. माळवाडी) यांची ५ लाख रुपयांची, चंद्रकांत गंगाराम नंदेश्वर (रा. गव्हर्नमेंट कॉलनी) यांची ५ लाख ७३ हजार २५० रुपयांची फसवणूक केली आहे.

ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा

मोहनानी यांनी त्यांच्यासह इतर आठ जणांची १ कोटी ९६ लाख ८३ हजार ५० रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण कायद्यानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | महिलेवर अत्याचार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Next Post

मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group