• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

Admin by Admin
April 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मांजर्डे (ता. तासगाव) येथील दत्तनगर परिसरातील रस्त्यालगत असलेले पत्र्याच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविणयासाठी लागणारा ११ लाख ३७ हजार रुपये किमतीचा कच्चा माल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे बनवण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्जसाठी मांजर्डेतून कच्चा माल पुरवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी प्रसाद बाळासाहेब मोहिते (रा. मांजर्डे) याला अटक केली होती. रविवारी त्याच्याच घरातून कच्चा माल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिस यांना इरळी येथे जप्त केलेल्या एमडी ड्रग्जचे मांजर्डेत कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी मांजर्डे येथील दत्तनगर परिसरात संशयित प्रसाद मोहिते याचे वडील बाळासाहेब रंगराव मोहिते यांच्या गट नंबर ३५६/ब रानात असलेल्या घरावर छापा टाकला.

घराच्या मागे असलेल्या शेडमध्ये पोलिसांना क्लोरोफॉर्म व ॲसिड असलेले बॅरेल मिळून आले. क्लोरोफॉर्मचे १५ बॅरेल व ॲसिडचे १२ कॅन सापडले. एकूण ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी ड्रग्ज बनविण्यासाठीचा हा कच्चा माल मांजर्डे येथून इरळी येथील कारखान्यात पाठविला जात होता. इरळी येथे एमडी ड्रग बनविल्यानंतर ते राज्यात इतरत्र पाठवले जात होते, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर टिंगरे, सहायक फौजदार मुलाणी, बिरोबा नरळे, अमोल ऐदाळे, बाबासाहेब मदने, दरिबा बंडगर, अविनाश घोरपडे, नायब तहसीलदार धनश्री स्वामी, ड्रग्ज निरीक्षक राहुल कारंडे, प्रा. अनिल पोवार, संदीप गुरव, प्रदीप पाटील, लहू जाधव आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक; शिरोळ तालुक्यातील तिघांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

ब्रेकिंग | सांगलीसह चार जिल्ह्यातून ‘या’ला केले तडीपार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगलीसह चार जिल्ह्यातून ‘या’ला केले तडीपार..!

ब्रेकिंग | सांगलीसह चार जिल्ह्यातून 'या'ला केले तडीपार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group