गोपनीय खबऱ्या | ऑनलाईन प्रतिनिधी – महाविकास आघाडीकडून विरोध करत हातकलंगले मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्याचं चित्र आहे. राजू शेट्टी आमच्यासोबत यावे अशी आमची इच्छा होती, मात्र त्यांचा विचार वेगळा दिसतोय असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे हातकणंगल्यात महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

