शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्याच्यांसह २०० पदाधिकारींनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.
पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार शिरुरची उमेदवारी जाहिर करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे अमोल कोल्हेंविरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होणार आहे. ही लढत जुनीच असली तरी राजकिय फासे मात्र उलटे पडलेत.

