• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | दागिने चोरीप्रकरणी २ महिलांना अटक, अडीच लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने जप्त

Admin by Admin
March 25, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | दागिने चोरीप्रकरणी २ महिलांना अटक, अडीच लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : शहरातील सराफी बाजारातील कोठारी गोल्ड सिल्व्हर ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील मुमताज नजीर शेख (६२) आणि नाजीया वसीम शेख (३३, दोघी रा.नयी जिंदगी, अमन चौक, सोलापूर) या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडील दोन लाख ५८ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी यावेळी या दोघींनी विटा पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीचा छडाही लावला. या दोघींची अधिक तपासासाठी विटा पोलिसांकडे रवानगी केली आहे.

२२ मार्चच्या दुपारी या दोघींनी गांधी चौकातील प्रतापचंद हुकमीचंद कोठारी यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने तेथील काउंटरवरील दागिने दाखवत असताना या हातचलाखीने १५ आणि २० ग्रॅम वजनाची सोन्याची प्रत्येकी एक बांगडी आणि साडेसात ग्रॅम वजनाचे मिनी गंठण चोरून पोबारा केला होता. ही बाब लक्षात येताच कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.

त्यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सोलापूर येथे जाऊन या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी इस्लामपूर आणि विटा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

या कारवाईत सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सागर गायकवाड, हवालदार दीपक ठोंबरे, आलमगीर लतीफ, सतीश खोत, वर्षा मिरजकर, पूनम खोत व सायबरचे कॅप्टन गुंडवाडे यांनी भाग घेतला. सागर गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीत सापडला एमडी ड्रग्जचा मोठा साठा..? ‘ ‘खबऱ्या’ची पक्की खबर..! ‘या’ गावात मोठा कारखाना .? वाचा सविस्तर

Next Post

ब्रेकिंग | साताऱ्यात पाच जुगार अड्ड्यांवर छापे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | साताऱ्यात पाच जुगार अड्ड्यांवर छापे

ब्रेकिंग | साताऱ्यात पाच जुगार अड्ड्यांवर छापे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group