• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगलीत सापडला एमडी ड्रग्जचा मोठा साठा..? ‘ ‘खबऱ्या’ची पक्की खबर..! ‘या’ गावात मोठा कारखाना .? वाचा सविस्तर

Admin by Admin
March 25, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Big breaking | MD Drug Sangli Connection : कवठेमहांकाळ प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आहे. या गावामध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी धडक कारवाई करण्याचे धाडस दाखवत ही कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.

सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय असून येथे मोठा कारखाना असल्याचाही सुगावा पोलिसांना लागल्याचं सांगितलं जात आहं. याची गोपनीय माहिती ‘खबऱ्या‘ने पोलिसांनी दिली आहे.

या कारवाईबाबत पोलिसांनी मात्र मोठी गोपनीयता बाळगली आहे. सांगलीमध्ये यापूर्वीदेखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली होती. आता पुन्हा एकदा ड्रग्जचं सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागच्या काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रग्जचे साठे सापडत आहेत. त्यामुळे देशभरातील ड्रग्जचं कनेक्शन पुढे आलेलं होतं. यात हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांना मिळून आलेलं आहे. आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने तिथे किती साठा सापडतो, यासाठी पोलिसांचे हे ऑपरेशन सुरू आहे. जवळपास स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना नव्हती.

कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व सांगली पोलिसांचा गुप्त विभाग नेमकं काय करतोय..? याबाबतीत उलटसुलट चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

Previous Post

मोठी बातमी : टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा मदतीसाठी टाहो

Next Post

सांगली | दागिने चोरीप्रकरणी २ महिलांना अटक, अडीच लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | दागिने चोरीप्रकरणी २ महिलांना अटक, अडीच लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने जप्त

सांगली | दागिने चोरीप्रकरणी २ महिलांना अटक, अडीच लाखांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group