• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | “संजयकाकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?” लोक संभ्रमात..! पडळकरांचा टोला

Admin by Admin
March 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरज | “संजयकाकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?” लोक संभ्रमात..! पडळकरांचा टोला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सांगली मतदार संघावरून कॉँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरू आहेत.

यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर एक असे काही नसतं, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थित लावली होती. त्यानंतर पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पडळकर म्हणाले, “आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर एक असे काही नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेला आहोत. मात्र, अजून देखील भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित झाले नसल्याने अजून सगळे लोक संभ्रमात आहेत असे, आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना मिळालेली आहे. आता उमेदवारी अर्ज भरणं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लोकसभेच्या निवडणूकीत रंग येईल. मात्र तरीही संजयकाकाच्या विरोधातला नेमका पैलवान कोण हे फायनल झाले नसल्याचे म्हणत पडळकरांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत काय म्हणाले पडळकर?

धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्या हा टेक्निकल विषय बनला आहे. आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल ; हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण करून मोबाईल हिसकावला..

Next Post

मोठी बातमी : टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा मदतीसाठी टाहो

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी बातमी : टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा मदतीसाठी टाहो

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group