• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल ; हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण करून मोबाईल हिसकावला..

Admin by Admin
March 25, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विशेष प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – महाराष्ट्रातील राजकारणात वेगळेच वातावरण तयार झालेले असताना सोलापूरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे आणखी एका गुन्ह्यात अडकले आहेत. आपल्या कार्यालयाजवळ ग्राहकांच्या दुचाकी लावण्याच्या कारणावरून एका हाॅटेलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ व मारहाण करून हाॅटेल जाळून टाकण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल संच हिसकावून नेल्याच्या आरोपावरून काळजे व त्यांच्या वाहनचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.काल रात्री शहरात सात रस्त्यावर हा प्रकार घडला.

यासंदर्भात स्टार हाॅटेलचे व्यवस्थापक वसीम अ. गफार पेशइमाम यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सात रस्त्यावर हाॅटेल स्टारच्या पाठीमागे मनीष काळजे यांचे कार्यालय आहे. तेथे येण्याजाण्यासाठी डाव्या बाजूने स्वतंत्र रस्ता आहे. रात्री त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोणी तरी अज्ञात व्यक्तीने दुचाकी लावली होती. ते पाहून मनीष काळजे व त्यांचा वाहनचालक दोघे स्टार हाॅटेलमध्ये येऊन व्यवस्थापक पेशइमाम यांना, तुमच्या ग्राहकांच्या दुचाकी गाड्या माझ्या कार्यालयासमोर का लावता, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. हाॅटेलमधील एका कामगाराने पेशइमाम यांच्या मोबाईलने या घटनेचे चित्रिकरण केले असता काळजे यांनी पुन्हा चिडून शिवीगाळ व मारहाण करीत २२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला. काळजे यांनी हाॅटेल कसे चालवता ते बघतो, हाॅटेल जाळून टाकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मनीष काळजे यांच्यावर गेल्या महिन्यात चार लाख रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यापूर्वी काही गुन्ह्यांची नोंद त्यांच्या नावावर आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गावगुंडांसह नागरिकांना त्रास देऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या संशयित गुन्हेगारांविरूध्द तडीपारीसह महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, अवैध व्यवसाय करण्यास प्रतिबंध कायद्याखाली (एमपीडीए) एक वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई हाती घेतली आहे. यात तथाकथित राजकीय पुढाऱ्यांनाही त्यांची जागा दाखविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनीष काळजे यांची गुन्हे विषयक नोंदीची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या विरूध्द पोलीस प्रशासन कोणती प्रतिबंधात्मक कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

Previous Post

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा सविस्तर..

Next Post

मिरज | “संजयकाकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?” लोक संभ्रमात..! पडळकरांचा टोला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | “संजयकाकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?” लोक संभ्रमात..! पडळकरांचा टोला

मिरज | "संजयकाकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?" लोक संभ्रमात..! पडळकरांचा टोला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group