• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा सविस्तर..

Admin by Admin
March 25, 2024
in राजकीय
1 min read
0
रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणूक होत आहे. अशात राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. मुंबईत काल रात्री उशिरा भाजपची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला अहमदनगरमधील भाजपचे नेते उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंदे सागर बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित होते.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर बैठकीला उपस्थित होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणिस भाजप नेते हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राम शिंदे यांमी सविस्तर प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर लोकसभेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानी बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे जायची इच्छा होती. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. त्या जागेसाठी इच्छुक होतो. आता अडचणीचं निराकरण झालं आहे, असं राम शिंदे म्हणाले.

अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल दुःख आहे ते कोणीतरी समजून घेतलंय त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. अहिल्या नगरचा भाजपचा खासदार झाला पाहिजे. यादृष्टीने बैठक सकारात्मक बैठक झाली, असं राम शिंदे म्हणाले.

राम शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यावर पक्षीय पातळीवर वाद मिटले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात. पक्षाने दिलेला आदेश मानून अबकी बार 400 साठी आम्ही तयार आहोत, असं राम शिंदे म्हणाले.

Previous Post

होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

Next Post

ब्रेकिंग | शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल ; हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण करून मोबाईल हिसकावला..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल ; हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण करून मोबाईल हिसकावला..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group