• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

Admin by Admin
March 25, 2024
in क्राईम
1 min read
0
होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

होळी सणानिमित्त शहर, गावातील सर्व मंडळी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील लोकांनी होळी दहनाची तयारी केली आहे.

मात्र, बुलडाण्यात होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा झाला आहे. बुलडाण्यातील विठ्ठलवाडीमध्ये होळी दहनाच्या वेळी दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली. या गावातील दोन गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी लहान मुलांचं भांडण झालं. या लहान मुलांच्या भांडणावरून गावातील दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या हाणामारीत सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

होळी दहनाच्या वेळी झालेल्या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीमध्ये ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. सध्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

नेमकं काय घडलं?

बुलडाण्याच्या विठ्ठलवाडी या गावात लहान मुलांनी होळी पेटवली, तेव्हा लहान मुलांचा गोंधळ सुरु होता. त्यावेळी मुलामध्ये धक्काबुक्की झाली. या लहान मुलांनी त्यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती दिली. या लहान मुलांच्या भांडणावरून मोठी मंडळी भांडायला लागली. या भांडणाचे रुपांत लाठ्याकाठ्याच्या मारहाणीत झालं. यात पुरुष-महिलांनी एकमेकांना जबर मारहाण केली.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले, (पाहा व्हिडिओ)

Next Post

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा सविस्तर..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा सविस्तर..

रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा सविस्तर..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group