• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले, (पाहा व्हिडिओ)

Admin by Admin
March 25, 2024
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी भीषण आग; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले, (पाहा व्हिडिओ)
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Madhya Pradesh Ujjain Mahakal Temple Fire मध्यप्रदेशच्या उज्जैन शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भयानक घटना घडली. महाकाल मंदिरात भस्म आरती सुरु असताना अचानक मंदिराच्या गर्भगृहात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील महाकाल मंदिरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भस्म आरती सुरू होती. या आरतीला शेकडो भाविक जमले होते. आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता.

याचदरम्यान मंदिराच्या गर्भगृहाला अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच भाविक धास्तावले. त्यांनी आरडाओरड सुरू करत मंदिराच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने मंदिरातील पुजाऱ्यासह १३ भाविक आगीत होरपळले.

#WATCH | Ujjain, Madhya Pradesh | 13 people injured in a fire that broke out in the 'garbhagriha' of Mahakal Temple during bhasma aarti today. Holi celebrations were underway here when the incident occurred. The injured have been admitted to District Hospital.

(Earlier visuals… pic.twitter.com/cIUSlRirwo

— ANI (@ANI) March 25, 2024

 

आगीची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीत जखमी झालेल्या १३ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जखमी भाविकांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीच्या घटनेमुळे लोक भाजले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून घटनेचा तपास केला जात आहे.

Previous Post

महादेव जानकरांचा अचानक यु-टर्न; कोणी केली मध्यस्थी अन् महायुतीत घरवापसी..

Next Post

होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठ्याकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group