• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | असं नसतंय राव..! महायुतीचा उमेदवार ‘संजयकाका’..! शिंदे-पवार गटाकडूनच मिळणार ‘धोका’.?

Admin by Admin
March 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, शोध पत्रकारिता
1 min read
0
सांगली | असं नसतंय राव..! महायुतीचा उमेदवार ‘संजयकाका’..! शिंदे-पवार गटाकडूनच मिळणार ‘धोका’.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  •  नेमकं काय घडतयं… वाचा सविस्तर

सांगली |✒️संकेतराज बने | गोपनीय खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. खरंतर युतीधर्म हा नावालाच असल्याचे मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या आरोपावरून स्पष्ट होतयं. संजयकाका पाटील हे ‘खुदगब्बर’ म्हणत महायुतीतील मित्रपक्षांना कसल्याच प्रकारची विचारणा करत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून केला जातोय.

लोकसभेच्या सांगली मतदारसंघात भाजपकडून प्रचार सुरू करण्यात येणार आहे. याची कुणकुण सुध्दा लागू न देता महायुती मधील मित्रपक्षांना विश्वासात घेतलं नसल्याचे आरोप उमेदवार असणाऱ्या संजय पाटील यांच्यावर होत आहेत. प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण महायुतीतल्या घटक पक्षांना अद्याप मिळाले नसल्याने आता नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

भाजपने सांगली मतदारसंघात संजय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षामार्फत तसेच संजय पाटील यांच्या समर्थकांकडून प्रचार कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी यांचा सहभाग दिसून येत असला तरी महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी दिसत नाहीत.

राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व शिवसेना ( शिंदे गट) या प्रमुख मित्रपक्षांच्या नेत्यांनी युतीधर्माचे पालन होईल, असे स्पष्ट केले असले तरी पक्षातील अन्य प्रमुख नेते, पदाधिकारी मात्र, ‘बिन बुलाये मेहमान’ होणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

सांगलीच्या जागेबाबत महायुतीतील कोणत्याच मित्रपक्षांनी अडचण निर्माण केली नाही. याउलट भाजपमधीलच अंतर्गत बंडाळी विलासराव जगताप यांच्या बोलण्यावरून दिसून आली. त्यामुळे प्रचाराला ‘हातात हात’ घालून फिरण्यास काहीच अडचण नव्हती. उमेदवारी ज्या पक्षाला मिळाली त्या भाजपकडून मित्रपक्षांच्या नेत्यांना निमंत्रण मिळावे इतकीच अपेक्षा असताना किमान तेही होत नसल्याने महायुतीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी मात्र नाराज झाले आहेत. या नाराजी नाट्याचा खेळ असाच सुरू राहिला तर महायुतीचे उमेदवार असणाऱ्या संजयकाका पाटील यांना मित्रपक्षाकडूनच धोका मिळण्याची दाट शक्यता आहे.

Previous Post

धक्कादायक | मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या..!

Next Post

बिग ब्रेकिंग | मसाज सेंटरमध्ये चालायचा ‘हा’ प्रकार..! महिलेसह ५ जण ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बिग ब्रेकिंग | मसाज सेंटरमध्ये चालायचा ‘हा’ प्रकार..! महिलेसह ५ जण ताब्यात

बिग ब्रेकिंग | मसाज सेंटरमध्ये चालायचा 'हा' प्रकार..! महिलेसह ५ जण ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group