• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | मसाज सेंटरमध्ये चालायचा ‘हा’ प्रकार..! महिलेसह ५ जण ताब्यात

Admin by Admin
March 23, 2024
in क्राईम
1 min read
0
बिग ब्रेकिंग | मसाज सेंटरमध्ये चालायचा ‘हा’ प्रकार..! महिलेसह ५ जण ताब्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर प्रतिनिधी | रियाज जैनापुरे | खबऱ्या ऑनलाईन – राजारामपुरी येथील एस. आर्केड बिल्डिंगमधील गाळा नंबर एफ 9 मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या हायप्रोफाईल वेश्याअड्ड्याचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला.

राजारामपुरीत एलिस स्पा अँड वेलनेस सेंटरमध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय चालत असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना या अड्ड्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक सायली कुलकर्णी यांना कारवाईच्या सूचना केल्या.

पथकाने शुक्रवारी दुपारी मसाज सेंटरवर छापा टाकला. यावेळी चार पीडित महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करून अड्डाचालक सुरेखा सरवदे, स्नेहा माळीसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरच्या झडतीत निरोधची पाकिटे, नोंदवही, मोबाईल, वाहनासह एक लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. अड्डाचालक सुरेखा मिलिंद सरवदे (वय 26) हिच्यासह पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या अन्य संशयितांमध्ये स्नेहा विजय माळी (20, सध्या रा. लाईन बाजार, कसबा बावडा, मूळ गाव चिपळूण, रत्नागिरी), उमेश बाळू शिंदे (31, महादेव गल्ली, पाचगाव), गणेश फुलचंद सोनवणे (कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा), वैभव बजरंग हवालदार (23, पाचगाव) यांचा समावेश आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या रॅकेटमध्ये पडद्याआड दडलेल्या संशयितांचाही पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी होत आहे. अटक केलेल्या संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

Previous Post

सांगली | असं नसतंय राव..! महायुतीचा उमेदवार ‘संजयकाका’..! शिंदे-पवार गटाकडूनच मिळणार ‘धोका’.?

Next Post

बडतर्फ पोलीसाची ५.४० कोटींची भानगडचं न्यारी..१२ जणांना झाली जेलची वारी..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!

बडतर्फ पोलीसाची ५.४० कोटींची भानगडचं न्यारी..१२ जणांना झाली जेलची वारी..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group