• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | गुटखा पकडला अन् ‘हा’ सापडला..! कर्नाटक सीमेवर ५ लाखांचा गुटखा जप्त : मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई..

Admin by Admin
March 22, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कर्नाटक सीमेलगत असलेल्या रस्त्यावर ९ तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. यांपैकी कागवाड रस्त्यावरील म्हैसाळ तपासणी नाका महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी २४ तास पोलीसांचा सक्त पहारा असून येणार्‍या सर्व वाहनांची कडकपणे तपासणी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामुळे पाच लाखांची गुटखा तस्करी म्हैसाळ येथे उघडकीस आली. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

तपासणी करत असताना गुरूवारी दुपारी वाहनाची (एमएच १० एक्यू ५३८४) याची झडती घेतली असता बंदी असलेल्या गुटख्याची पोती आढळली. वाहनात पोत्यात भरलेली विमल मसाला, विमल तंबाखू, विमल किंग तंबाखू व किंग तंबाखू असा सुमारे पाच लाखाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गुटख्यासह वाहन जप्त केले असून अकबर शेख (वय ४५ रा. शंभर फुटी रोड, पाकिजा मस्जिदजवळ सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनही जप्त करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मिरज | हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत, आता चिंता करण्याची गरज नाही..! सेवासदन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ‘हे’ तंत्रज्ञान..! 

Next Post

धक्कादायक | मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक | मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या..!

धक्कादायक | मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group