मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन- सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक आरोग्यसुविधा व तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात नेहमीच अग्रेसर आहे. हीच परंपरा कायम ठेवत सेवासदनने नुकतेच हृदयरोग उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ओसिटी ( Optical Coherence Tomography ) सर्व परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी बोलताना रुग्णालयाचे संचालक डॉ. रविकांत पाटील म्हणाले “सेवासदनमध्ये, आमच्या रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर सतत भर देतो. OCT तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कॅथेटरद्वारे एक छोटा कॅमेरा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आत पर्यंत नेला जातो. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज किती लांब आहे, किती प्रमाणात आहे, यामध्ये कॅल्शिअम कितपत आहे. ज्यामुळे ब्लॉक कितपत कठीण आहे. ते व्यवस्थित समजते, सध्याच्या एक्स रे तंत्रज्ञानामुळे घेतल्या जाणाऱ्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची माहिती लाईव्ह २ डी मध्ये दिसते. ज्यामुळे इतर माहितीबरोबर स्टेण्ट पूर्णपणे अगदी योग्य जागी बसला आहे का हे अचूकपणे समजणे सहज शक्य नसते, पण आता OCT तंत्रज्ञानामुळे आता ते शक्य आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी अचूक ठरतात व रुग्णास भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिरज इंडियन मेडिकल असोशिएशनचे प्रमुख व जेष्ठ मेंदूरोग तज्ञ डॉ. नाथानियल ससे उपस्थित होते. ते म्हणाले, “वैद्यकीय सेवा सतत झपाट्याने बदलत आहेत. तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक विकास होतो आहे. सेवासदन अश्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेस मध्ये सुद्धा यशस्वीरित्या करता येणार आहे.
हा उदघाटन सोहळा आयएमए मिरजचे अध्यक्ष डॉ. नाथानियल ससे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. या वेळी हॉस्पिटलचे सर्व संचालक, वैद्य व इतर कर्मचारी उपस्थित होते.

