• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग |भीषण आग.! उद्धव ठाकरेंच्या मिरजमधील सभास्थळानजीक मोठी आग!

Admin by Admin
March 21, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरज ब्रेकिंग |भीषण आग.! उद्धव ठाकरेंच्या मिरजमधील सभास्थळानजीक मोठी आग!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज विशेष |गोपनीय खबऱ्या | ऑनलाईन प्रतिनिधी – सांगलीत आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडत आहे. मात्र या सभेच्या मैदानाजवळच मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या सभेच्या नजीक मोठी आग लागल्याने गोंधळ निर्माण झाला.

उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेत आज त्यांची सभा पार पडणार आहे. या सभास्थळी उद्धव ठाकरे पोहोचले. दरम्यान कार्यकर्त्यांनी फाटाके उडवून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र याच दरम्यान फटाक्यांतील एक ठिणगी बाजूच्या मैदानावर जाऊन पडली. या मैदानातील कागद, पाला पाचोळ्यावर ही ठिणगी पडल्याने भीषण आग लागली. या दुर्घटनेनंतर कार्यकर्त्यांची आग विझवण्यासाठी तारांबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सभेदरम्यान घडलेल्या दुर्घटनेने परिसरात गर्दी निर्माण झाली.उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे सभेनजीक ही आग लागल्याची माहिती आहे.

सांगलीतील उद्धव ठाकरे यांच्या या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का? याकडे लक्ष असणार आहे. या सभेसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यासमोर नाना पटोले अन् संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक; पवारांना करावी लागली मध्यस्थी..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | पैलवानानं उमेदवारीचं मैदान मारलं..! काँग्रेसवर कुरघोडी करत उध्दव ठाकरेंनी केली चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | पैलवानानं उमेदवारीचं मैदान मारलं..! काँग्रेसवर कुरघोडी करत उध्दव ठाकरेंनी केली चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा..

सांगली ब्रेकिंग | पैलवानानं उमेदवारीचं मैदान मारलं..! काँग्रेसवर कुरघोडी करत उध्दव ठाकरेंनी केली चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group