• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | पैलवानानं उमेदवारीचं मैदान मारलं..! काँग्रेसवर कुरघोडी करत उध्दव ठाकरेंनी केली चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा..

Admin by Admin
March 21, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | पैलवानानं उमेदवारीचं मैदान मारलं..! काँग्रेसवर कुरघोडी करत उध्दव ठाकरेंनी केली चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचं घोडं अडलं आहे. त्याचवेळी सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी दावा केल्याने तिढा निर्माण झाला होता.

सांगली हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने तिथून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. आज सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठामधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

आज मिरज येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, होय आज मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून येऊन दिल्लीत जातील. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे. हा मर्द तुमच्यासाठी लढण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. चंद्रहार पाटील जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा त्यांनी मला एक गदा भेट दिली. ती गदा मी घऱी ठेवली आहे. मात्र मी चंद्रहार यांना सांगतो की, ही समोर दिसतेय ती तुमची खरी गदा आहे. जोपर्यंत ही गदा तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्ध्याची चिंता करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगितले.

Previous Post

मिरज ब्रेकिंग |भीषण आग.! उद्धव ठाकरेंच्या मिरजमधील सभास्थळानजीक मोठी आग!

Next Post

सांगली | ‘जिद्दीला पेटलो तर स्वत:चंही ऐकत नाही’; चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | ‘जिद्दीला पेटलो तर स्वत:चंही ऐकत नाही’; चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला..!

सांगली | 'जिद्दीला पेटलो तर स्वत:चंही ऐकत नाही'; चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group