• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | पिनॉमिक ट्रेडर्सच्या तपासातील प्रगतीची माहिती द्या- न्यायालयाचे आदेश

Admin by Admin
March 19, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली -कोल्हापूर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – ‘पिनॉमिक ट्रेडर्स आणि डेव्हलपर्स व पिनॉमिक व्हेंचर्स एल. एल. पी कंपनी’ विरोधात गुंतवणूकदारांनी फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीच्या अनुषंगाने केलेल्या तपासात कोणती प्रगती केली याची माहिती देण्यासाठी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांनी आज दिले.

२०२३ साली सांगली शहर पोलिस ठाण्यात कंपनी व त्यांचे संचालक विपुल पाटील, पंकज पाटील व इतरांवर गुन्हा नोंद झाला होता. तसेच तो गुन्हा सांगली जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग झाला. त्याच सुमारास येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुद्धा या कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. त्याचा तपास सुरू आहे; परंतु हा तपास समाधानकारक नाही. तो तपास एसआयटी स्थापन करून करावा किंवा राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करावा यासाठी याचिकाकर्त्यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सुनावणीत सरकारी वकिलांनी कंपनीच्या सुमारे २७ मालमत्ता जप्त केल्याची माहिती न्यायालयात दिली. गुंतवणूकदार मुकुंद चव्हाण व इतरांनी अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल केलेल्या रिट याचिकेवर आज सुनावणी झाली. पोलिसांना कंपनीच्या मालमत्ता महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध सरंक्षण कायद्यांतर्गत जप्त करावी, विपुल पाटील या मास्टर माईंडला अटक करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. पुढील सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केल्याचे वकिलांनी सांगितले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | उमेदवारी न दिल्यास ‘या’ चार मतदार संघातून भाजपचा पराभव करणार : नेत्याने दिला भाजपला थेट इशारा

Next Post

काय सांगताय राव..! सांगलीत ‘या’ सोन्याची सर्वत्र चर्चा..! आठ तोळ्याची काय भानगड.. वाचा सविस्तर.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

काय सांगताय राव..! सांगलीत 'या' सोन्याची सर्वत्र चर्चा..! आठ तोळ्याची काय भानगड.. वाचा सविस्तर.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group