• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | उमेदवारी न दिल्यास ‘या’ चार मतदार संघातून भाजपचा पराभव करणार : नेत्याने दिला भाजपला थेट इशारा

Admin by Admin
March 18, 2024
in राजकीय
1 min read
0
भाजपची जयसिंगपूर मंडल कार्यकारिणी जाहीर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला भाजपचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यांनी थेट भाजपविरोधातच शड्डू ठोकला आहे. मोहिते पाटील कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न दिल्यास, माढा, सोलापूर, बारामती आणि सातारा हे चार लोकसभा मतदारसंघ भाजपला गमवावे लागतील असा थेट निर्वाणीचा इशारा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी मोहिते पाटील कुटुंबाने विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत भाजप नेतृत्वाने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.

जयसिंह मोहिते पाटील

निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील समर्थकांनी या उमदेवारीला विरोध दर्शवित धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. भाजप मधील हा अंतर्गत वाद अधिकच पेटला जाऊ लागल्याने, भाजपचे नेते गिरीश महाजन अकलूज येथे दाखल झाले. त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी गुप्त बैठक केली मात्र प्रश्न काही मार्गी लागला नाही. मोहिते पाटील आपल्या मागणीवर ठाम राहिले.

महाजन यांनी काही दमबाजी करण्यापूर्वीच मोहिते पाटील कुटुंबाने आक्रमक भूमिका घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या फाईल काढा आम्हाला जेल मध्ये घाला आता आम्ही माघार घेणार नाही. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाची आहे. आता आम्ही निवडणूक लढविली नाही तर आमचा गट जिवंत राहणार नाही. त्यामुळे आम्हाला उमदेवारी द्या आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत. तुम्ही उमेदवारी नाही दिली तरी आम्ही निवडणूक लढणार आहोत. तुम्हाला काय कार्यवाही करायची ती करा, लोकांना कळू द्या उमेदवारीला विरोध केला म्हणून आम्हाला जेलमध्ये घातले, असा निर्वाणीचा इशारा दिल्याची चर्चा अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरून कानावर येत होती. मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | महाविकास आघाडीच्या जागावाटपावर ‘गोपनीय खबऱ्या’ ला दिल्या नेत्यांनी प्रतिक्रिया : म्हणाले, वेळ प्रसंगी…..

Next Post

बिग ब्रेकिंग | पिनॉमिक ट्रेडर्सच्या तपासातील प्रगतीची माहिती द्या- न्यायालयाचे आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

बिग ब्रेकिंग | पिनॉमिक ट्रेडर्सच्या तपासातील प्रगतीची माहिती द्या- न्यायालयाचे आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group