• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

काय सांगताय राव..! सांगलीत ‘या’ सोन्याची सर्वत्र चर्चा..! आठ तोळ्याची काय भानगड.. वाचा सविस्तर.!

Admin by Admin
March 19, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना सर्वसामान्य आणि शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेर सोने गेले आहे. पण त्यांची सोन्याच्या वस्तराने दाढी व्हावी आणि त्यांना आनंद मिळावा; या हेतूने सोन्याच्या वस्तराने दाढी केली जात आहे.

सांगलीच्या रिळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी हा अनोखा उपक्रम केला आहे. रिळेसारख्या ग्रामीण भागात हा आठ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकाची रीघ लागली आहे. सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्ताऱ्याने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित केसकर्तनालयाचे दुकान गेली अनेक दशके सुरू आहे. वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी समर्पित केले आहे. कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच! अशोक देसाई यांनी पत्नीच्या समर्थ साथ व अमोल आणि प्रदीप ही दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळले. जेमतेम शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा- वीस वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत. प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात ओढा आहे. माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे. या व्यवसायाबरोबर सामाजिक कामामध्येही सहभाग असतो.

साडेपाच लाख खर्चून बनविला वस्तरा..!

एकीकडे सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना ते आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोने घेता येत नाही. निदान सोन्याच्या वस्तराने त्यांची दाढी करावी, हा मानस मणी बाळगून गेल्या काही वर्षापासून व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा भावांनी आई-वडिलांना बोलून दाखवला होता. दोघा भावांनी व्यवसाय करता करता मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी सुरू केली. दहा पंधरा वर्षाच्या व्यवसायातून त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखाचा दाढी करण्याचा सोन्याचा वस्तरा बनविला. हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीघ लागली आहे. अनेक ग्राहक वेटिंगमध्ये आहेत.

Previous Post

बिग ब्रेकिंग | पिनॉमिक ट्रेडर्सच्या तपासातील प्रगतीची माहिती द्या- न्यायालयाचे आदेश

Next Post

ब्रेकिंग | मैत्रिणीवर मारायचे दोघेही ‘लाईन’ ; गैरसमजातून मित्राची धारधार शस्त्राने कट केली ‘लाईफलाईन’..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मैत्रिणीवर मारायचे दोघेही ‘लाईन’ ; गैरसमजातून मित्राची धारधार शस्त्राने कट केली ‘लाईफलाईन’..!

ब्रेकिंग | मैत्रिणीवर मारायचे दोघेही 'लाईन' ; गैरसमजातून मित्राची धारधार शस्त्राने कट केली 'लाईफलाईन'..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group